सणासुदीच्या काळात महागड्या सिल्क व डिझायनर साड्यांची ‘अशी’ करा देखभाल, जाणून घ्या..


उरुळी कांचन : सण समारंभानुसार महागड्या साड्या वर्षातून दोन ते तीन वेळा घातल्या जातात. मात्र त्यांची काळजी फारशी घेतली जात नाही. तेव्हा सिल्कच्या किंवा इतर महाग साड्यांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे

आज केवळ सिल्कच्या साड्या नाही तर पैठणी, कांजीवरम, बनारसी, ब्रोकेड, डिझायनर या सर्वच प्रकारच्या साड्या खूप कमी वेळा घातल्या जातात. मात्र त्यांची देखभाल केली जात नाही. त्यामुळे अनेकदा साड्यांची चमक कमी होण्याचा धोका असतो. या साड्यांची देखभाल कशी करावी याबाबत ही थोडक्यात माहिती.

साडी नेसून झाल्यावर ती ठेऊन देण्यापूर्वी जरा मोकळ्या हवेत ती पसरून ठेवावी. डिज़ाईनर किंवा खूप वर्क असलेल्या साड्या बराच वेळ पसरून ठेवा. तसंच साडया चांगल्या राहाव्या म्हणून त्यांच्या घड्या सतत बदलत राहाव्या. एकाच पद्धतीच्या घड्या ठेवल्यामुळे साडी त्या भागावर विरळ होण्याची शक्यता असते. साड्या हँगरला लावून ठेऊ नका. त्यामुळे अनेकदा हँगरच्या खुणा साडयांना पडू शकतात. कपाटांत सुती किंवा मऊ कापडात साड्या ठेवाव्यात. त्यामुळे त्या खराब होत नाहीत.

आता महिलांसाठी काही ब्युटी टिप्स

– जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चेह-याचा अतिरिक्त तेलकटपणा हटवण्यासाठी थंड पाण्याच्या ऐवजी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
– तेलकट त्वचा स्वच्छ करण्यासाठी क्लिंजींग आणि टोनिंग करणं गरजेचं असतं. मात्र त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होईल इतक्या वेळा चेहरा क्लीन करण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. नाहीतर चेहरा कोरडा होईल.

– तेलकट त्वचेसाठी लोक सतत स्क्रबिंग करतात. मात्र तेलकट त्वचेलाही सतत स्क्रबिंग करण्याची गरज नाही. तर आठवड्यातून फक्त दोन वेळा स्क्रब करा. जर तुमच्या चेह-यावर मुरुमाचे फोड असतील तर स्क्रब करू नका.

– जर तुमची त्वचा कोरडी असेल तर मेकअप करण्याच्या आधी चांगलं मॉइश्चराईझर लावून त्यानंतर लिक्विड फाउंडेशन लावा आणि मग कॉम्पॅक्ट पावडर लावा.
– तेलकट त्वचेसाठी मेकअप करण्याच्या पूर्वी मॉइश्चराईझर लावून मग वॉटरप्रुफ फाऊंडेशन लावा. मग त्यावर मॅट लिपस्टिक, आय लायनर आणि मस्कारा लावा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!