घरफोड्या करणारा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार जेरबंद, ८ तोळे सोने, २ किलो चांदीसह १६ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त…

पुणे : घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास जेरबंद करून साडे आठ तोळे सोन्याचे दागिने, २ किलो चांदीची भांडी, रोख रक्कम सह १६ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भोर शहरात श्रीपतीनगरमध्ये रात्री कुलूप बंद असलेल्या चार घरांमध्ये अज्ञात चोरटयाने घरफोडी करत चोरी केली होती.

या चोरीमध्ये घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 16 लाखांचा मुद्देमाल चोरी करून नेला होता. याबाबत माधव दामोधर पुरोहीत यांनी फिर्याद दाखल केली होती. भोर शहरातील मध्यवती ठिकाणी एकाच वेळी चार कुलुप बंद असलेल्या घरांमध्ये घरफोडी वोरी करणेत आलेली होती त्याचप्रमाणे सदर घटनेत मोठया प्रमाणात मुद्देमाल चोरी गेलेला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः तपासात सहभाग घेत एक पथक नेमण्यात आले होते.

तपासादरम्यान घटनास्थळाकडे जाणारे येणारे सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सदर घटनेत एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले, उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फुटेज आधारे गुन्हा घडण्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले असता सदरचा व्यक्ती हा चोरी होण्यापूर्वी सहा ते सात तास अगोदर श्रीपतीनगर परिसरात येवून गेला असल्याचे निष्पन्न आले.
त्यामुळे त्यानेच चोरी केल्याची खात्री झाल्याने सीसीटीव्ही फुटेज बातमीदारांकडून पडताळून घेतले असता तपास पथकाला गोपनीय बातमीदारा कडून बातमी मिळाली की, सदरची घरफोडी चोरी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सचिन राजु माने रा. मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर याने केली आहे. गुन्हेगार शिरवळकडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा पाठलाग करत त्यास पुणे-सातारा रोडवरील ससेवाडी परिसरात ताब्यात घेण्यात आले.
त्याचेकडून गुन्हयाचे तपासादरम्यान साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन किलो ग्रॅम वजनाची चांदीची भांडी, रोख रक्कम, कार असा एकूण १६ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीवर सुमारे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, आरोपीने कर्नाटक राज्यात चोरी केल्यानंतर सात वर्षाची शिक्षा भोगलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सो, पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, भोर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आण्णासाहेब पवार, दत्ताजीराव मोहिते, अंमलदार बाळासाहेच खडके, अमोल शेडगे, मंगेश भगत, महेश बनकर, मंगेश थिगळे, विजय कांचन, धिरज जाधव, अजित भुजबळ, काशिनाच राजापुरे, केतन खांडे, अतुल मोरे यांनी याबाबत तपास केला.
