ओटीटीवर सर्जनशीलतेच्या नावावर शिव्या, असभ्यपणा चालणार नाही : अनुराग ठाकूर


मुंबई : अोटीटी प्लॅटफॉर्मवर सर्जनशीलतेच्या नावाखाली शिवीगाळ कदापी सहन केली जाणार नाही,असा इशारा केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला आहे.

 

ठाकूर काल नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले , ओटीटी प्लॅटफाॅर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील कंटेंटच्या तक्रारीबाबत सरकार गंभीर आहे. या संदर्भात नियमांत दुरुस्ती करावयाची झाल्यास ती केली जाईल. कारण, या प्लॅटफॉर्मला सर्जनशीलतेसाठी स्वातंत्र्य मिळाले होते, अश्लीलतेसाठी नाही .

 

ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर आहे. जर यासाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करेल. सर्जनशीलतेच्या नावाखाली, असभ्य शिवीगाळ स्वीकारली जाणार नाही. यावर काही कारवाई करण्याची गरज पडली तर सरकार मागे हटणार नाही” असा इशारा अनुराग ठाकूर यावेळी दिला आहे.

 

तत्पूर्वी ,गेल्या काही काळापासून, या तक्रारी वाढण्यास सुरुवात झाली आहे. अत्यंत गांभीर्याने त्याकडे आमचा विभाग बघतो आहे.या नियमावलीत बदल करण्यासंदर्भात आम्ही गांभीर्याने विचार करतो आहोत असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!