इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशींनी दिला राजीनामा…!


नवी दिल्ली : इन्फोसिस ही एक लोकप्रिय टेक कंपनी आहे. या कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे .इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी राजीनामा दिला आहे.अलिकडच्या दिवसात इन्फोसिसच्या उच्च पदावरून पायउतार होणारे हे दुसरे व्यक्ती आहेत. मोहित जोशी यांनी इन्फोसिसच्या आधी ABN Ambro, ANZ Grindlays या कंपनीमध्ये काम केले आहे.

मोहित आता टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. ते जूनपर्यंत इन्फोन्सिसचे काम करतील. गेल्या २२ वर्षांपासून ते इन्फोसिसमध्ये काम करत होते.

 

दरम्यान , वर्ष २००० मध्ये ते इन्फोसिसमध्ये रुजू झाले होते. इन्फोसिस यांनी सांगितले होते की, मोहित जोशी ११ मार्च २०२३ पासून रजेवर जाणार आहे. कंपनीसोबतचा त्यांचा शेवटचा दिवस ९ जून २०२३ हा असेल. इन्फोसिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मोहित कंपनीच्या सॉफ्टवेअर, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा, जीवन विज्ञान व्यवसायाचे प्रमुख होते.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!