इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ‘त्या’ वक्तव्यावरून गुन्हा दाखल…

मुंबई : पुत्रप्राप्तीसाठीच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या इंदुरीकर महाराजांची निराशा झाली आहे.
गुन्ह्याची खालच्या न्यायालयात सुनावणी घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
इंदोरीकर महाराज हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात “सम तारखेला स्त्रीसंग केल्यावर मुलगा आणि विषय तारखेला केल्यावर मुलगी होते”, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या वक्तव्यावरून त्यांच्यावर अहमदनगरमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. परंतु सत्र न्यायालयाने हा खटला रद्द केला.
त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाकडून इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करत संगमनेर कोर्टात खटला चालवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द करण्याची याचिका दाखल केली होती.
आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. गुन्हा रद्द करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर पुन्हा सत्र न्यायालयात खटला चालणार आहे.