India Alliance : ममता बॅनर्जी बाहेर पडल्या, नितीशकुमार बाहेर पडले, आता अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय, इंडिया आघाडीला धक्का…


India Alliance : ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना रविवारी (ता.२८) इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधणाऱ्या नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून माघार घेतली आहे.

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलासोबतची युती तोडून त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही जखम ताजी असतानाच इंडिया आघाडीला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील आगामी विधानसभा निवडणूक आप एकट्याने लढणार आहे, जाहीर केले आहे. हरिणायात विधानसभेच्या ९० जागा आहे. या जागा आप स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. India Alliance

मात्र, असे असले तरी, या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्ष इंडिया आघाडीसोबत लढणार आहे, असंही केजरीवाल यांनी सांगितले. हरिणायात विधानसभेच्या ९० जागा आहे. या जागा आप स्वबळावर लढणार असल्याचं केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का देत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याची घोषणा केली होती. India Alliance

त्यानंतर बिहारमधील नितीश कुमार यांचा जेडीयू पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. त्यातच आता अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील विधानसभेच्या निवडणुका आप एकट्याने लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!