इंदापूरमध्ये खळबळ! दीपक काटे यांना २ पिस्तुल, २८ जिवंत काडतुसे घेऊन जाताना अटक…


इंदापूर : तालुक्याला हादरवणारी माहिती समोर आली आहे. सराटी येथील दीपक सीताराम काटे (वय ३२, रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना पुणे विमानतळावर अटक केली. दीपक काटे हे भाजपाचे पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. दीपक काटे यांच्या पिशवीत पिस्तूल, दोन मॅगझीन, तसेच २८ काडतुसे सापडली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दीपक काटे हे विधानसभा निवडणुकीत आमदार भरणे यांचा प्रचार करत होते. आता त्यांना अटक केल्याने त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. आमदार भरणे हे दीपक काटे यांना सोबत घेऊन रोज सभा घेत होते, काटे हे अनेकदा गुन्हेगारी क्षेत्रात काम करतात, अशीही माहिती इंदापूरमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

याबाबत विमानतळावरील सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. त्यांनी प्रवाशाला पकडून पोेलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत इंडिगो एअरलाइन्सचे सुरक्षा अधिकारी प्रीती भोसले यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पावणे अकराच्या सुमारास प्रवाशांच्या पिशव्यांची तपासणी करत होत्या. काटे हे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून हैदराबादला जाणार होते.

सामानाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी धातूशोधक यंत्राकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत काटे यांच्या पिशवीत पिस्तूल, दोन मॅगझीन, तसेच २८ काडतुसे सापडली. याबाबत काटे यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी पिस्तूल का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!