इंदापूरमध्ये कोयता गॅंगकडून दहशद! बलात्काराची फिर्याद मागे घेत नाही म्हणून केले सपासप वार…

इंदापूर : इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी कोयता गॅंग सक्रिय झाली असून कोणत्याही गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा वापर अधिक होऊ लागला आहे. यामुळे यावर वचक बसवण्याची गरज निर्माण झाली असून नागरिक भयभीत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत माहिती अशी की, भिगवण परिसरातील एका घटनेत पाच जणांनी पारधी समाजातील दांपत्यावर कोयत्याने वार केले. गुरुवारी सकाळी फिर्यादी महिला तिच्या पती व मुलासह उजनीच्या धरण क्षेत्रात मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी गुन्हा दाखल झालेले पाच जण आले आणि मुलीने केलेली बलात्काराची केस मागे घे, असे सांगितले.
नंतर या महिलेच्या पतीच्या पाठीवर कोयत्याने वार केले. यानंतर पीडित महिला भांडण सोडवण्यासाठी गेले असता तिच्याही उजव्या मनगटावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर पाच जणांनी लाथा बुक्क्यांनी दोघांना मारहाण केली.

यामुळे मोठी खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेनंतर भिगवण पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ॲट्रॉसिटी, जीवघेणा हल्ला आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर पोलिसांनी याबाबत अधिकचा तपास सुरू केला आहे.

यामध्ये किशोर हिरालाल गजरे, राजेश दगडू मोरे, हिरा गजरे, विनोद दगडू मोरे व गणेश मोहन परदेशी (सर्व रा. तक्रारवाडी ता.इंदापुर अशी या पाच जणांची नावे असून ते सर्व फरार आहेत. पोलीस सध्या त्यांचा तपास करत आहेत. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.