महागाई वाढली म्हणून खासदारांच्या वेतनात २४ टक्क्यांनी वाढ, इतरही लाखो रुपयांच्या सुविधा, एकाही खासदारांचा विरोध नाही, सर्वसामान्य जनतेचं काय?

नवी दिल्ली : सध्या महागाई वाढली म्हणून देशातील आजी-माजी खासदारांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशातील राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचं वेतन तब्बल 24 टक्क्यांनी वाढलं आहे.
विशेष म्हणजे याला कोणी विरोध केला नाही. सध्या मार्च एंडिंग जवळ आलं की सर्व पगारदारांना आपल्या वेतन वाढीचे वेध लागतात. सर्वसामान्य पगारदारांचं वेतन वाढेल की नाही माहिती नाही. असे असताना खासदारांना वेतन वाढवल्याने चर्चा सुरू झाली आहे.
यामध्ये पूर्वी 1,00,000 रुपये असलेले वेतन आता 1,24,000 रुपये झाले आहे. तसेच प्रति दिन भत्ता 2000 होता तो आता 2500 करण्यात आला आहे. तसेच माजी खासदार दरमहा वेतन पूर्वी 25,000 रुपये आता 31,000 रुपये करण्यात आला आहे. बाहेर कोणतेही खासदार वेतनवाढीचे उघड समर्थन करत नाहीत.
पण सभागृहात कुणीही विरोध केलेला नव्हता. त्यामुळे अनेक मुद्द्यांवर रोज वाद घालणाऱ्या खासदारांचे स्वत:च्या वेतनवाढीबाबत मात्र एकमत झालं, इतर अनेक सुविधा देखील वाढवण्यात आल्याने आता याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर कोणीही आवाज उठवला नाही.
सध्या महागाई ही सर्वसामान्य लोकांना देखील परवडत नाही, यामुळे याचा देखील विचार सरकारने करण्याची गरज असल्याचे लोकांचे म्हणणे आहे, मात्र सरकार याकडे किती गांभीर्याने विचार करत आहे. याबाबत सर्वांनाच शंका आहे.