मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकारी असे सांगत तब्बल १८ लाख लुटले …!!

मुंबई : एका बड्या व्यापाऱ्याच्या घरी ‘स्पेशल २६’ स्टाईल रेड पडली आहे. इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची सांगत या टोळीने व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकत तब्बल १८ लाखांची रोकड लुटल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्सचे अधिकारी बनून सायन येथील पटवा नावाच्या व्यापाराच्या घरात घुसले होते. पटवा नावाच्या या व्यापारी कुटुंबाने बहिणीच्या लग्नासाठी आणलेली असलेली तब्बल १८ लाख रुपयांची मोठी रक्कम ”अधिकाऱ्यां” समोर ठेवली.
त्यांनंतर कागदपत्रे तपासण्याचा बनावट करत, पैश्यांचे फोटो काढले आणि काही दिवसातच तपास पूर्ण करू मात्र तोवर कॅश जप्त करत असल्याच त्यांनी सांगितल आणि त्यांनतर १८ लाख रूपये घेऊन पसार झाले.
असे सापडले पोलिसांच्या जाळ्यात आरोपी…
चार दिवस उलटून देखील जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा कुटुंबाने चौकशी केली. हा सगळी बनावट असल्याच समोर येतात सायन पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी इमारतीतील तसेच परिसरातून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि आरोपींच्या ईनोवा कारच्या नंबर वरून एक एक करून आठ आरोपींना अटक केली. कुटुंबातील एकाच्या मित्राला घरातील लग्नाची तसेच घरात असलेल्या कॅशची माहिती होती.
दरम्यान, त्यानेच आरोपींना टीप दिल्याच तपासत निष्पन्न झालं. आरोपींना अटक करणाऱ्या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली