उरुळी कांचन येथे वाहन प्रशिक्षण शिबीरामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न..

उरुळी कांचन : वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी सीट बेल्ट, हेल्मेट आणि इतर सुरक्षा साधनांचा वापरास प्रोत्सान दिल्यास अपघातास आळा बसू शकतो. असे मत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक शाहिद जमादार यांनी व्यक्त केले आहे.
उरुळी कांचन येथे वाहन प्रशिक्षण शिबीरामध्ये या ठिकाणी गुरुवार (ता. १८) ३५ वा सडक सुरक्षा साप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाहिद जमादार बोलत होते.
यावेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक संतोष गांगर्डे, राणी वर्पे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्नेहा पाटील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कस्तुरी प्रतिष्ठान अध्यक्ष मिलिंद मेमाणे,हवेली तालुका ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन चे अध्यक्ष विलास सायकर, राजेंद्र बगाडे,शंकर कुंभारकर, राजेंद्र गायकवाड,कुणाल सातव,वैभव गोरे, सचिन गायकवाड,आण्णा सांवत, आदि उपस्थित होते.
सहायक मोटार वाहन निरीक्षक शाहिद जमादार म्हणाले की , “अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी प्रोत्सान देण्याची गरज असून अपघातानंतर बघ्याची भूमिका घेऊ नका, वाहन चालवताना मोबाईचा वापर टाळा. शारीरिक व मानसिक स्थिती बरोबर असेल तरच वाहन चालविले पाहिजे.”
रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असलेली घोषवाक्य सादर करण्यात आले. ‘होईल दोन मिनिटांचा उशीर, पण जीवन राहील सुरक्षित’, ‘नका देऊ प्राण, नका घेऊ प्राण, डावीकडून चालून राखा आयुष्याची शान’, ‘पाळूया निर्बंध रहदारीचा, करुया प्रवास आनंदाचा’, ‘उल्लंघन कराल रहदारी नियमांचे, अपंग व्हाल आयुष्यात कायमचे’, असे विविध जनजागृतीपर घोषवाक्य सादर करत रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने सुरक्षित वाहतुकीचा जागर केला.
दरम्यान, शिकाऊ उमेदवारांना व वाहनचालकांना तसेच उपस्थित असलेल्या नागरिकांना सडक सुरक्षा अभियानाचे पथनाट्य (ए भाई जरा देख के चलो) दाखवण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक संतोष गांगर्डे यांनी चालकांना लायसन्स व इतर प्रमुख कागदपत्रांचे महत्व सांगून वाहनधारकांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.