पुण्यात सराईत गुन्हेगारावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण..

पुणे : पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सराईत गुन्हेगार पच्चीस उर्फ फैजान रमजान शेख ( वय. 21, रा. सय्यद नगर कोंढवा) याच्यावर दुचाकीवरून आलेल्या एकाने पिस्तूलातून गोळीबार केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मान्सूनचा मुहूर्त हुकला! २०१८ नंतर पहिल्यांदाच १० जून नंतर मान्सूनचं होणार आगमन, काळजी वाढली..
गुलामअलीनगर महंमदवाडीरोड परिसरात घडली आहे. त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून, पोटात गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पच्चीस हा गुलामअलीनगर मंमदवाडी परिसरातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेले एकाने त्याच्यावर दोन राउंड फायर केले.
त्यामध्ये तो जखमी झाला. एका व्यक्तीने पोलिसांना गोळीबाराची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार करणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सध्या पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. यामुळे पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.