कोलवडीत एकावर कोयत्याने सपासप वार, तर काकांचे हॉटेल येथे चाॅपरने वार, घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण..
हवेली : कोलवडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकावर कोयत्याने वार, तर काकांचे हॉटेल येथे चाॅपरने वार करण्यात आला आहे.
येथे मित्रांच्या सोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर काही किरकोळ वादातून एका इसमाने चाॅपरने वार केल्याची घटना कोलवडी मांजरी खुर्द रोड वरील काकांचे हॉटेल येथे घडली.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी नितीन कुंजीर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत कवडे नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
तसेच कोलवडी येथील माळवाडी रोड येथे काही जुन्या वादाच्या कारणावरून लोखंडी कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवार सकाळी साधारण अकराच्या सुमारास घडली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे.
याप्रकरणी निलेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. कोयत्याने हल्ला करणाऱ्या समीर कोळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशन करीत आहे. या दोन्ही घटना गंभीर असून पोलीस तपास सुरू आहे.