लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ऑक्टोबरचा १५०० रुपयांचा हप्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा करते. या आर्थिक मदतीमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा आधार मिळत आहे. मात्र, आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची प्रतीक्षा महिलांना लागली आहे. अशातच लाडक्या बहिणींच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये मिळाले

लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याकडे महिलांचे लक्ष लागले होते. दिवाळी आणि भाऊबीज हे सण जवळ आल्याने सरकारने लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अखेर दिवाळीपूर्वी सरकारकडून पात्र महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये जमा करण्यात आले.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन महिन्यांचे मिळून एकाच वेळी ३,००० रुपये मिळतील, अशी चर्चा होती. मात्र, सरकारकडून महिलांना केवळ सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये देण्यात आले.

ऑक्टोबरचा हप्ता २५ नोव्हेंबरपर्यंत मिळणार?

आता ऑक्टोबर महिन्याचे १,५०० रुपये कधी जमा होणार, असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने निधी वितरणाचा निर्णय घेतल्यास २५ नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

मात्र, २५ नोव्हेंबर ही सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली तारीख नाही. त्यामुळे हप्त्याच्या तारखेबाबत महिलांनी सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.

लाडक्या बहिणींना एकत्र ३,००० रुपये मिळणार का?

दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे ३,००० रुपये एकत्र मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, तर डिसेंबरमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये दिले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मात्र, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र देण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हप्ता नेमका कधी मिळणार आणि ३,००० रुपये एकत्र जमा होणार का, हे सरकारच्या आगामी निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!