IIT ची डिग्री, कॅनडाची 3 लाखांची नोकरी सोडली अन् कुंभमेळा गाठला, आता IIT बाबाची खरी माहिती आली समोर….


प्रयागराज : उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये भरलेल्या कुंभमेळाची सध्या देशभरात चर्चा होते. कधी आर्थिक उलाढालीमुळं कुंभमेळा चर्चेत येत आहे, तर कधी कुंभमेळ्याच्या महत्त्वाबद्दल बोलला जाते, तर कधी जमलेल्या लाखोंच्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. यासोबतच सध्या चर्चेचा विषय ठरतात ते कुंभमेळ्यात सहभागी झालेले साधू आणि साध्वी.

यामध्ये डोक्यावर कबूतर ठेवणारे कबूतर बाबा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमुळेही अनेकजण चर्चेत येत आहेत. आता आयआयटीयन बाबा म्हणजेच राघव हे चर्चेत आले आहेत. हा बाबा अंगावर भगवी वस्त्र आणि हातात रुद्राक्षांच्या माळा घालतो, तो कधी मोक्षाचा मार्ग सांगतो तर कधी फिजिक्स बद्दल बोलतो. तो प्रेमात पडला असून म्हणूनच त्याने हा मार्ग निवडला असल्याचे सांगितले जात आहे.

त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नंतर तो मेळ्यातून गायब झाला होता. त्याला त्याच्या गुरुंनी आखाड्यातून हाकलून दिल्याची चर्चा होत आहेत. तो नशेच्या भरात बोलत असल्याचे गंभीर आरोपही केले जातात. हरियाणाच्या सासरोली हे त्याचं गाव आहे. इंजिनिअरिंग मधून बी टेक ची डिग्री घेतली त्यानंतर आयडी बॉम्बे मधून असताना विजन कम्युनिकेशनचा कोर्स केला.

त्याने डिझाईन मीडिया आणि फोटोग्राफी याविषयी अभ्यास केलाय. त्याचे जुने फोटो सहित व्हायरल झाले होते. शिक्षणानंतर त्याने तीन वर्ष कॅनडामध्ये नोकरी केली. तिथे त्याला महिना तीन लाख रुपये पगार असल्याचे तो सांगतो. पण त्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. यादरम्यान तो कोणाशीच बोलायचं नाही. फक्त काम करत राहायचा. तेव्हा सगळ्या गोष्टींना कंटाळून तो भारतात आला भारतात येऊन त्याला पडलेला प्रश्नांची उत्तर शोधण्याचा त्याने प्रयत्न केला.

ध्यान करत असताना घरचे त्यात अडथळा आणायचे. म्हणून मागच्या वर्ष दीड वर्षापासून मी माझं घरही सोडले. मी डिप्रेशनमध्ये असताना घरी गेलो होतो. तेव्हा घरच्यांनी मी नाटक करत असल्याचे आरोप केले. असं बाबांना काही इंटरव्यूमध्ये सांगितले. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

त्याच्या वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, त्याचे वडील वकील आहेत, म्हणाले की गेल्या वर्षभरापासून आमच्या मुलाने आम्हाला ब्लॉक केलंय. आपला मुलगा घरी परत यावा असं आम्हालाही वाटतय. पण आता तो खूप पुढे निघून गेलाय. त्यामुळे आता तो घरी येणार नाही. असं करण सिंह यांचं म्हणणं आहे. मात्र यावर माझ्या घरचे नाटक करतायेत काहीही बोलतात असे अभय सिंहने सांगितले.

तो नशा करायला लागला काहीही बोलायला लागला म्हणून त्याला आखड्यातून हाकलून दिले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नंतर त्याने हे आरोप फेटाळून लावले, तो म्हणाला, मला प्रसिद्धी मिळाली म्हणून काहीही बोलले जात आहे. त्याच्या घरचे देखील त्याला भेटायला आले आहेत. मात्र तो अजून भेटला नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!