मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर ती आधी माझ्यावर घाला, जालना घटनेवरून संभाजीराजे आक्रमक…

जालना : माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी जालन्यातील मराठा आंदोलनकाची भेट घेतली. यावेळी त्यांनी लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला. आंदोलकांवर तुम्ही गोळीबार कसाकाय करु शकता. मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर ती आधी छत्रपती संभाजीराजेवर घाला अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
काल जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्याचबरोबर हवेत गोळीबार देखील केला. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे दिसत आहे.
मराठा आंदोलकांशी संभाजी राजे यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, कालच्या घटनेवर बोलणं मी क्रमप्राप्त समजतो. शिवाजी महाराजांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी येथे बोलत आहे. शाहू महाराजांनी जगाच्या, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षण बहुजनांना दिले होते.
तमचे सरकार दिल्लीत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील आहे. त्यामुळे आम्हाला सांगा आता किती दिवस आरक्षणाचा लढा द्यायचा असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर आरक्षण कधी देणार ते पहिले सांगा.
आंदोलकांवर गोळ्या घालायला हे काय पाकिस्तानचे लोक आहेत का? ते काही दहशतवादी आहेत का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
ज्या माणसाने अंतरवाली सराटी गावात हे कृत्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे निलंबन झाल्याशिवाय मी गप्प बसणार नसल्याचे संभाजी महाराज म्हणाले आहेत. त्याचबरोबर मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला असे देखील वक्तव्य संभाजी महाराज यांनी केला आहे.