मंदिरात सोनं दान करायचं असेल तर काळजी करू नका!! मंदिरातच एटीएममधून काढता येणार सोन्या चांदीची नाणी, ते कसं जाणून घ्या…


मुंबई : हैदराबादच्या एका कंपनीनं असे मशीन बनवले आहे की त्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. तुम्ही एटीएम मशीनमधून डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे काढता, पण याच एटीएम मशीन मधून डेबिट क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय वापरून आता थेट सोन्याचे नाणी तुम्ही काढू शकणार आहेत.

या मशीनचे उद्घाटन हे तिरुपती येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मंदीर परिषदेत झाले आहे. अनेक वेळा आपण मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरातून त्या मंदिराशी जोडलेल्या वस्तू घेत असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन मंदिरांसाठी विशेष एटीएम मशीन सारखे दिसणारे मशिन बनविण्यात आले आहे. यामुळे भक्तांना जर सोन्याचे नाणे दान करायचे असेल तर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

ज्यातून आपण सोने आणि चांदीचे कॉइन डेबिट किंवा क्रेडिट कार्डने घेऊ शकतो. सोने आणि चांदीचे प्रति ग्रॅमचे भाव हे मशिन तुम्हाला दाखवते आणि त्यावरून आपल्या खिशाला परवडेल असा पर्याय आपल्याला वापरता येतो. यामुळे तुम्हाला यावेळी सोन्याचे दर देखील समजणार आहेत.

पेमेंटची प्रोसेस संपल्यावर या मशीन मधून जीएसटी आणि मेकिंग चार्जसकट एक बिल बाहेर येते. अनेक वेळा आपण मंदिरात सोने चांदी दान करतो किंवा भेट देताना दैवतांचे कोरीव असलेले शिक्के देतो. त्यामुळे हे मशीन ज्या मंदिरात असतील त्या त्या ठिकाणावरील देवतांचे रुप तुम्हाला या शिक्क्यांवर पाहायला मिळेल.

दरम्यान, सध्या तिरुपतीमध्ये भगवान वेंकटेश्वर आणि गोविंदराज स्वामींच्या रूपात हे कॉइन उपलब्ध आहे. तुमच्या जवळ असलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ने अथवा यूपीआयने तुम्ही हव्या त्या रकमेचे ट्रांन्झेक्शन केले की जसे एटीएममधून पैसे येतात तसे या मशीनमधून नाणी येतात. यामुळे या मशीनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!