पोट दुखण्याशिवाय जर ‘ही’ लक्षणं दिसली तर असू शकतो किडनी स्टोन, जाणून घ्या लक्षणे..


Kidney Stone : शरीरामध्ये खनिजे आणि क्षार पदार्थ यांची मात्रा वाढल्यास शरीरामध्ये किडनी स्टोन तयार होऊ लागतो. जेव्हा जेव्हा आपल्या पोटात ऑक्जालेट, कॅल्शिअमसारखे क्रिस्टल्स जमा होतात तेव्हा एक गाठ सारखी संरचना तयार होते. ही गाठ दगडासारखी कठीण असते.

यालाच किडनी स्टोन म्हटलं जातं. स्टोन हा किडनीमध्ये होतो त्यामुळे याला किडनी स्टोन म्हटलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे, हे खडे लहान धान्यांपासून मोठ्या धमन्यांपर्यंत वेदनादायक स्वरूपात तसेच वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात.

या घटकांच्या जमावामुळे किडनीमध्ये दगडासारखी कठीण गाठ तयार होते. किडनी स्टोनचा आकार लहान धान्याएवढा असू शकतो, तसेच काहीवेळा मोठ्या धमन्यांपर्यंतही त्याचा विस्तार होतो, ज्यामुळे तीव्र वेदना आणि इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

किडनी स्टोन होण्याची प्रमुख कारणे काय?

अधिक मीठ व प्रथिनेयुक्त आहार – जास्त मीठ आणि प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे मूत्रपिंडावर ताण येतो, परिणामी स्टोन तयार होऊ शकतो.

आजार आणि औषधांचे दुष्परिणाम – हायपरपॅराथायरॉईडीझम, लठ्ठपणा, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन तसेच काही विशिष्ट औषधे किडनी स्टोनच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.

कौटुंबिक इतिहास – जर घरात इतर सदस्यांना हा त्रास झाला असेल, तर तो वारसाहक्काने पुढील पिढीत देखील होण्याची शक्यता असते.

आहारातील बदल – पालक, काजू, चॉकलेट यांसारखे ऑक्जालेटयुक्त पदार्थ अधिक खाल्ल्यास मुतखडा होण्याची शक्यता वाढते.

अनेक कारणांमुळे मूत्रपिंडात खडे निर्माण होऊ शकतात. मुख्यतः शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. पुरेसे पाणी न पिल्यास लघवी गडद होते आणि त्यातील खनिज पदार्थ साठून खडे तयार होण्याचा धोका वाढतो.

किडनी स्टोनची लक्षणे जाणून घ्या..

मूत्रपिंडात स्टोन तयार झाल्यास अनेकवेळा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. मात्र, जर स्टोन मोठ्या प्रमाणावर असेल आणि मूत्रमार्गात अडथळा आणत असेल, तर खालील लक्षणे जाणवू शकतात ..

तीव्र वेदना – पाठीच्या खालच्या भागात, ओटीपोटात किंवा मांडीवर तीव्र वेदना जाणवते.

लघवी करताना त्रास – जळजळ, वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

रक्तमिश्रित लघवी – लघवीचा रंग लाल किंवा तपकिरी होऊ शकतो.

मळमळ आणि उलट्या – काही प्रकरणांमध्ये पचनासंबंधी समस्या जाणवतात.

ताप आणि थंडी – जर संसर्ग झाला असेल, तर ताप येऊ शकतो.

जर वरील लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उशीर केल्यास मूत्रमार्ग अडथळित होऊन मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

किडनी स्टोन टाळण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा…

पुरेसे पाणी प्या – दररोज ८-१० ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.

संतुलित आहार – सोडियम आणि ऑक्जालेटयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा.

नियमित व्यायाम – वजन नियंत्रणात ठेवल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.

कॅल्शिअमचे प्रमाण योग्य ठेवा – तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात योग्य प्रमाणात कॅल्शिअम असलेले पदार्थ घ्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!