मी जेवायला आलो तर माझं बिल घेऊ नका, माझं जेवण बाकी…! उद्घाटनाच्यावेळी अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यासाठी नेहेमी चर्चेत असतात. अनेकदा भाषण करताना ते उपस्थितांची ते फिरकी घेतात. आता आज पुण्यातील चाकण येथे वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळीच दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.

वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आलेले अजित पवारांनी दौऱ्यादरम्यान एका हॉटेलचे उद्घाटनही केले. यावेळी त्यांच्याकडे वेळ कमी असल्याने त्यांनी नाश्ता जेवण करण्यास पुन्हा येईल असे सांगितले. इतकंच नाहीतर मी पुढच्यावेळी हॉटेलला जेवायला आलो तर माझं बिल घेऊ नका, अशी अजित दादांनी यावेळी मिश्किल टिप्पणी केली.
यावेळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार यांनी बोलताना सांगितले की, हॉटेल मालक मला म्हणाले अजित दादा नाष्टा करुन जा, पण आज खरंच वेळ नाही. पुढच्या वेळी आलो की नक्की जेवण करेन. तेव्हा मात्र माझं बिल घेऊ नका. असे अजितदादा यावेळी म्हणाले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच पुढे दादा असेही म्हणाले, पण हा चेष्टेचा भाग झाला. मी स्पष्ट सांगतो. राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. हॉटेलमध्ये कोणी ही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल. असं बोलत असताना भाषणामध्ये बोलणाऱ्याला अजित दादांनी झापल्याचे पाहायला मिळाले. याचा विडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
