मी दोन्ही छत्रपतींचा आदर करतो, माझं निलंबन रद्द करा!! आमदार अबू आझमी यांची विनंती…

मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. औरंगजेबाची चुकीची प्रतिमा रंगवली जात आहे. औरंगजेबाच्या कार्यकाळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता, असा जावईशोध टीसनी लगावला. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
असे असताना अबू आझमी यांनी सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, मी जे काही बोललो ते प्रत्यक्षात इतर अनेक इतिहासकार आणि लेखकांच्या अभ्यासावर आधारित होते. मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही.
मी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांचाही आदर करतो. माझे निलंबन रद्द करण्याची मी आदरपूर्वक विनंती करतो. असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. यामुळे अध्यक्ष काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. याबाबत वादग्रस्त विधानाबद्दल आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले होते.
आझमी यांनी छत्रपती संभाजीराजे व औरंगजेब याच्यातील युद्धाविषयी बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता तसेच छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेब यांच्यामध्ये धर्माची लढाई नव्हती सत्तेची होती असे देखील ते म्हणाले आहेत. दरम्यान, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान पासून ब्रम्हदेशपर्यंत होती.
त्याकाळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता. औरंगजेबाची प्रतिमा सध्या चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरांची उभारणी केली असेही ते म्हणाले. यामुळे वाद निर्माण झाला आहे.