५१ वर्षात एवढा पाऊस मी बघितला नाही!! अजित पवारांकडून इंदापूरमध्ये पूर पाहणी, पंचनाम्याचे आदेश, उसाच्या लागण तारखेतही बदल..


भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील सणसर आणि भवानीनगर येथे नुकसानग्रस्त कॅनॉल व अतिवृष्टी ग्रस्त ठिकाणांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यादरम्यान त्यांनी शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं, समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांना काही सूचनांसह झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

तसेच बारामती तालुक्यातील कन्हेरी काटेवाडी येथील कॅनॉल नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. यावेळी कन्हेरी वन, कन्हेरी गाव, पिंपळी, काटेवाडी गाव, ढेकळवाडी इथल्या शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना करण्यासहित काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

यावेळी अजित पवार म्हणाले, 51 वर्षातून एवढा मोठा पाऊस झाला. यामुळे 1-7 ला होणारी उसाची लागण नोंद आता 15-7 ला होणार आहे. याबाबत जाचकबापू आणि इतर चेअरमन यांच्याशी चर्चा केली आहे. इतर पिकांचे पंचनामे सुरु आहेत. वर्षभरात पडतो तेवढा पाऊस एकाची दिवशी पडला.

अल्पसंख्याक समाजाची घरे आहे पडली आहेत. त्यांना भरपाई दिली जाईल. मी बारामतीकडून पाहणी करतोय माझे सहकारी मंत्री दत्तामामा भरणे इंदापूरकडून पाहणी करत आहेत. दरम्यान, बारामती इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. यामुळे मोठा गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी कॅनॉल देखील फुटला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!