मी शरद पवारांना काल ही दैवत मानत होतो, आज ही मानतो पण तळ्यात मळ्यात…!! अजित पवारांचे मोठं वक्तव्य

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये काल पार पडलेल्या विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांविषयी महत्त्वाचं वक्तव्य केले आहे.
मी शरद पवार यांना काल ही दैवत मानत होतो, आज ही दैवत मानतो, पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडवली आहे.
या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमधील आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करत, अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, माझ्या हातात हे शहर होतं, महापौर, विरोधी पक्षनेते यांसारखी अनेक जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. स्वार्थ न पाहता जनतेच्या विकासासाठी काम केले आहे.
अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांच्या प्रवासाचं कौतुक करत म्हणाले की, “पानटपरी चालवणारे अण्णा आज आमदार, आणि आता विधानसभा उपाध्यक्ष झाले आहेत. त्यांनी कधी हार मानली नाही. १९९१ मध्ये मी इथे आलो, तेव्हा गाववाले आणि बाहेरचे अशी चर्चा होती, पण अण्णा आता पूर्णपणे इथलेच झाले आहेत.”
शहरातील नदी व कचऱ्याचा प्रश्नही त्यांनी अधोरेखित केला. काही जण वेगळं बोलतात, त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं पाहिजे, जर त्यात तथ्य असेल आणि जनतेच्या अडचणी दूर होत असतील, तर आपण एक पाऊल मागे-पुढे टाकायला तयार आहोत, असं मत त्यांनी मांडले.
दरम्यान, आपल्या भाषणात त्यांनी जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेचाही उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अनेक देशांना फटका बसला आहे. कोविडनंतरचं हे सर्वात मोठं संकट आहे,” असं मत मांडत त्यांनी स्थानिक प्रश्नांच्या जोडीला जागतिक मुद्द्यांनाही स्पर्श केला.