HSC-SSC Result 2024 : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ तारखेला लागणार दहावी-बारावीचा निकाल, जाणून घ्या…

HSC-SSC Result 2024 : सध्या दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. यावर्षी दहावीला 17 लाख विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. सध्या विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत.
आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे. यामध्ये दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी तर बारावीचा 25 मे ला लागणार आहे.
सध्या राज्यात बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जात आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापूर्वी नोंदवून ठेवले आहेत. त्यानुसार निकाल तयार होतील. यामुळे काही अडचण येणार नाही. याबाबत शिक्षण विभाग लक्ष देऊन आहे. HSC-SSC Result 2024
सध्या उत्तरपत्रिका तपासून जशा पूर्ण होतील तसे गुणपत्रिका तयार होत आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढली आहे, अशी माहिती समोर आली आहे. याची माहिती राज्य मंडळाकडून घेतला जात आहे. तसेच पुढील प्रवेशाचे देखील नियोजन केले जात आहे.
यामध्ये आता अगोदर निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर ते विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा आणि कॉलेजमध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. नंतर पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.