शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात वर्णन कसे कराल? जयंत पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर; म्हणाले, काही भरवसा…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत एका वर्तमानपत्राच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी घेतली. या मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील विविध विषयांच्या संदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली.
या मुलाखतीमध्ये जयंत पाटलांनी आपल्या खास शैलीत मुख्यमंत्री फडणवीस यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे दोन वाक्यात वर्णन काय कराल? शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे वर्णन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘काही भरोस नाही.’ या एका वाक्यात दोघांच्या वागण्याची पद्धती आली, असे देखील फडणवीसांनी सांगितले आहे.
दिल्लीला कधी जाणार? नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस. या सगळ्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस स्वत:ला कुठे पाहतात?’, असा प्रश्न जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शारीरीकदृष्ट्या फीट आहेत. ७५ वर्षांची मर्यादा ठरवली असली तरी ती पक्षाला मान्य होईल असे नाही. आमचे मत आहे नरेंद्र मोदींजींनी २०२९ मध्ये देखील पंतप्रधान व्हावे. असे ते म्हणाले आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला कुणाहीबरोबर अन्याय न करता वागण्याची जबाबदारी टाकली आहे.
मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही, हा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.