ओडिसामध्ये अपघात नेमका कसा झाला? किती ट्रेन एकमेकांवर धडकल्या, रेल्वे प्रशासनाने दिली महत्वाची माहिती..

ओडिशा : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, मालगाडी तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात तब्बल २८८ जणांचा मृत्यू झाला आहे . तसेच ११७५ हून अधिक जण जखमी झाले असून त्यातील ५६ लोक गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
काय सांगता! सेक्सला खेळ म्हणून मान्यता, आता रंगणार सेक्स चॅम्पियनशिप..
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं कारण रेल्वेने नमूद केला असून, एकापाठोपाठ एक तीन रेल्वे एकमेकांना धडकल्याने हा गंभीर आणि भीषण अपघात घडला. कोरोमंडल एक्सप्रेस चा वेग तब्बल १३० किलोमीटर प्रति तास असा होता.
या रेल्वेच्या चालकाला बहनगा बाजार या ठिकाणी हिरवा सिग्नल मिळाला. ही रेल्वे वेगात असल्याने काही घडण्यापूर्वीच मेन लाईन वर जाण्याऐवजी लूक लाईन वर गेली आणि या लाईनवर मालगाडीला कोरोमंडल एक्सप्रेस ने जोरदार धडक दिली.
ही धडक बसल्याबरोबर तब्बल २१ डबे रुळावरून घसरले. काही डबे मालगाडीवर चढले, तर काही डबे मेन लाईनच्या दिशेने गेले आणि त्याचवेळी मेन लाईन वरून बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस येत होती. या एक्सप्रेसने या डब्यांना धडक दिली आणि अशा रीतीने तब्बल तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्या.
इंजिन ड्रायव्हर, गार्ड जखमी
या अपघातात दोन रेल्वेगाड्यांचे इंजिन ड्रायव्हर व गार्ड जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मालगाडीचे इंजिन ड्रायव्हर व गार्ड या जखमी झाले नाहीत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा लोको पायलट, त्यांचा सहायक तसेच गार्ड व बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा गार्ड या अपघातात जखमी झाला.
मटण केले नाही म्हणून पतीकडून पत्नीच्या डोक्यात विळ्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना
रेल्वेकडून १० लाख मदत
मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून १० लाखांची, गंभीर जखमींना दोन लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.