आरोपी सैफच्या घरात कसा शिरला? कोणी मदत केली?, पोलिसांकडून मोठा खुलासा..

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. विजय दास असे आरोपीचे नाव आहे. काल मध्यरात्री ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही कारवाई करण्यात आली. सध्या आरोपीची चौकशी सुरु आहे. आता नुकतंच याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे.
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी एकाला अटक केल्यानंतर आज सकाळी 9 वाजता डीसीपी दीक्षित गेडाम यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत डीसीपी दीक्षित गेडाम यांनी संपूर्ण माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १६ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिनेता सैफ अली खानवर यांच्या घरी जबरी चोरी आणि हल्ल्याची जी घटना झाली, त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जबरी चोरीच्या उद्देशाने आरोपीने घरात प्रवेश केला होता. सैफ अली खान प्रकरणी अटक केलेला आरोपी हा बांगलादेशी आहे. त्याच्याकडे भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
तो मूळचा बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याने अवैधरित्या भारतात प्रवेश केलेला आहे. तो भारतात आल्यानंतर त्याने नावात बदल केलेला असल्याची शक्यता आहे. विजय दास असे त्याचे आता नाव आहे. हा आरोपी काही महिन्यांपूर्वीच मुंबईत आला आहे, अशी माहिती मिळाली आहे.
काही दिवस तो मुंबईत राहिला. त्यानंतर तो पुन्हा मुंबईच्या बाहेर गेला आणि आता १५ दिवसांपूर्वीच तो मुंबईत परतला. तो एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता, अशी माहिती मिळाली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, १६ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिनेता सैफ अली खानवर यांच्या घरी जबरी चोरी आणि हल्ल्याची जी घटना झाली, त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आहे. त्याचे वय ३० वर्ष असे आहे. हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न होत आहे. चोरीच्या उद्देशानेच आरोपीने घरात प्रवेश केल्याचं आतापर्यंत स्पष्ट झाले आहे, असेही पोलिस म्हणाले.