दादांच्या प्रेमाखातर!! बारामतीत साधा कार्यकर्ता अजित दादांचा वाढदिवस कसा साजरा करतो? वाचून तुम्ही पण म्हणाल लैच भारी…

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे अनेक चाहते वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे एक चाहते त्यांचा व्यवसाय असलेल्या केस कापण्याच्या उपक्रमातून तो गेली पाच वर्षे अजित पवारांना शुभेच्छा देत आहेत.
बारामती शहरातील तांदळवाडी या ठिकाणी असलेल्या बोरावके वृद्धाश्रमामध्ये रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोफत दाढी व कटिंग करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यांचे नाव आकाश पगारे हे अजितदादांचा वाढदिवस आगळे वेगळ्या पद्धतीने साजरा करतात.
शुक्रवारी त्यांनी नियमितपणे हा उपक्रम पार पाडला. या प्रसंगी किशोर मेहता, राजेंद्र बोरावके, फक्रुद्दीन बोहरी, अमित बोरावके, अभय शहा, डॉ अजिंक्यराजे निंबाळकर, डॉ, अजित आंबर्डेकर, डॉ सई सातव, उद्योजक सुरेंद्र भोईटे, किरण शेळके आदी उपस्थित होते.
आकाश पगारे हे गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. सलूनमध्ये ज्येष्ठ नागरिक येऊ शकत नाही, म्हणून त्यांच्याच घरी जाऊन व्यवसाय करताना सदर कल्पना सुचली व उपक्रम सुरू केला. सदर उपक्रम मोफत दोन दिवस चालतो.
सामाजिक बांधिलकी जोपासत सदर उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवित असतो. हार, तुरे ,फ्लेक्स, आदींवर खर्च न करता मोफत दाढी कटिंग चा उपक्रम राबवित असल्याचे आकाश पगारे यांनी सांगितले. हा उत्तम व आदर्शवत उपक्रम आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.