कोल्हापुरात भीषण अपघात!DYSP वैष्णवी पाटलांच्या कारची लॉरीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू


कोल्हापूर :आज रविवारी पहाटे कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास वैष्णवी पाटील या आपल्या सहकाऱ्यांसह कारने बेंगलोरवरून कोल्हापूरच्या दिशेने परतत होत्या. त्यावेळी त्यांची कार्यकाल लॉरीला मागून जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात वाहनांचा चक्का चूर झाला आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने, या भीषण अपघातातून DYSP वैष्णवी पाटील बचावल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर दोघांच्या वर ही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्यामुळे चालकाला डुलकी लागली की अन्य काही तांत्रिक बिघाडामुळे कार लॉरीवर धडकली, याचा तपास चित्रदुर्ग पोलीस करत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!