पुणे, पालघर, महाड-पोलादपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर..

पुणे : राज्यात सध्या पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. सध्या पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत संकट उभं केलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पालघर, महाड-पोलादपूर, गोंदिया, पुणे, गोदिंया या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Rain Alert) सकाळपासूनच पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, पालघर, गोंदिया, रायगड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नद्यांची पातळी वाढली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वच शाळा आज बंद राहणार आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे सांगण्यात आले आहे.

तसेच मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून सकाळपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला. काही नद्यांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही रेड अलर्ट लागू आहे. बेवारटोला प्रकल्प भरून वाहू लागला आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात इंद्रावती आणि परलाकोटा नद्यांना पूर आल्यानं पूरस्थिती कायम आहे. काल संध्याकाळी रस्ता सुरू करण्यात आला होता, मात्र आज पुन्हा पावसाचा जोर वाढला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याबाबत प्रशासनाकडून काळजीचे आवाहन करण्यात आले आहे.