होळी सणासाठी पुणे ते बरौनी दरम्यान धावणार ४ होळी स्पेशल ट्रेन…!
पुणे : होळी या सणानिमित्त कोकण, उत्तर प्रदेश तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने होळी सणासाठी ४ साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापैकी गाडी क्रमांक ०५२८० साप्ताहिक विशेष पुण्याहून ११-०३-२३ ते १८-०३-२३ रोजी ५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १ वाजता बरौनी येथे पोहोचेल. दुसरी गाडी क्रमांक ०५२७९ साप्ताहिक विशेष बरौनी ०९-०३-२३ ते १६-०३-२३ रोजी १२:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०:३० वाजता पुण्याला पोहोचणार आहे.
या प्रवासदम्यान रेल्वे या स्थानकांवर दौंड मार्ग लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चेओकी, पं दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटीलपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्ती थांबे घेत प्रवास करणार आहे.
विशेष ट्रेनमध्ये १६ शयनयान कक्ष आणि ८ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. वरील गाड्यांसाठी विशेष शुल्कावर आरक्षण सर्व PRS केंद्रांवर आणि रेल्वेच्या अधिकृत www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.