ब्रेकिंग! HMPV व्हायरलची आता महाराष्ट्रात एंट्री, ‘या’ जिल्ह्यात आढळले 2 रुग्ण, उडाली खळबळ…

ह्युमन मेटाप्युमोव्हायरस चीनमध्ये वेगानं वाढत आहे. भारतात आतापर्यंत 7 रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. अहमदाबादमध्ये १ महाराष्ट्रातील नागपूर आणि बेंगळुरूमध्ये प्रत्येकी २ चेन्नईमध्ये १ आणि कोलकातामधील १ मुलाला ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत.
सर्वप्रथम सोमवारी सकाळी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ३ महिन्यांची एक मुलगी आणि ८ महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. ब्रोंकोन्यूमोनिया झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीला बॅपटिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तेथे चाचणीत तिला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले.मात्र, रिपोर्ट येण्यापूर्वीच तिला रुग्णालयातून घरीदेखील सोडण्यात आले. ८ महिन्यांचा बालकसुद्धा ब्रोंकोन्यूमोनियामुळे याच रुग्णालयात दाखल असून, त्यालादेखील एचएमपीव्हीचा संसर्ग झाला आहे.
आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कर्नाटकच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कर्नाटकनंतर गुजरातच्या अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या एका मुलाला या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली.
सर्दी, तापामुळे गेल्या १५ दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या या मुलावर उपचार सुरू आहेत. काही दिवस त्याला व्हेंटिलेटरवरदेखील ठेवण्यात आले होते. संध्याकाळपर्यंत तामिळनाडूमध्येदेखील दोन मुलांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले. या दोन्ही मुलांवर दोन स्वतंत्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या सूचना…
काय करावे?
खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यूने झाकून ठेवा.
साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक पदार्थ खा
संसर्ग कमी करण्यासाठी हवा खेळती राहील याची दक्षता घ्या.
हे करू नका..
हस्तांदोलन,टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळा
आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा