हिंदी राष्ट्रभाषा नाही!! क्रिकेटर रविचंद्रन आश्विनचे मोठं वक्तव्य, सोशल मीडियावर वादाला सुरुवात….

मुंबई : नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तडकाफडकी अलविदा केला होता. अश्विनच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला. गाबा कसोटीनंतर अश्विन ऑस्ट्रेलियाहून मायदेशी परतला होता. असे असताना त्याचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे.
आपल्या भाषणादरम्यान अश्विनने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की कोणाला हिंदीत प्रश्न विचारण्यात रस आहे का, ज्यामध्ये कोणीही स्वारस्य दाखवले नाही. यानंतर अश्विन म्हणाला, मला वाटलं हे सांगावे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, असे मोठे वक्तव्य त्याने केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
तसेच तो म्हणाला, हिंदी अधिकृत भाषा आहे. आर. अश्विनच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अश्विनने अशा मुद्द्यांवर भाष्य करणे टाळावे, असा युक्तिवाद काही लोकांनी केला. महाविद्यालयाच्या कार्यक्रमात पदवीदान समारंभात अश्विनने हिंदी भाषेवर भाष्य केले.
तो म्हणाला, हिंदी शब्द बोलल्यानंतर लोक कसे प्रतिक्रिया देतात ते त्याने पाहिले. ‘मला वाटते की मी असे म्हणायला हवे की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, ती अधिकृत भाषा आहे.’ हिंदी आणि तमिळ भाषेबद्दल नेहमीच चर्चा होत असते हे ज्ञात आहे. तामिळनाडूमध्ये हा एक संवेदनशील मुद्दा आहे.
तसेच अश्विन म्हणाले की, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. अश्विनने विद्यार्थ्यांना विचारले की जर कोणाला इंग्रजी किंवा तमिळ बोलता येत नसेल तर त्यांना हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यास रस आहे का? असेही त्याने म्हटले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.