शिंदे, फडणवीस यांना नमस्कार पण अजिदादांना…! मोदींनी केलेल्या कृतीची रंगली चर्चा..

पुणे : लोकमान्य टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक दिलेल्या महाराष्ट्राच्या भुमीला माझे कोटी कोटी प्रणाम देतो, असे मराठीत संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांची मने जिंकली. आता अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे.
लोकमान्य टिळक पुरस्कार नरेंद्र मोदींनी स्वीकारला. नरेंद्र मोदींसह विविध मान्यवरांचे भाषण झाले. हा कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वांची पुन्हा एकदा भेट घेतली.
यावेळी राज्यपाल राजेश बैस, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार केला. पुढे अजित पवार होते. त्यांना मात्र हात न मिळवता अजितदादांच्या हातावर नरेंद्र मोदी यांनी थाप दिल्याचं पाहायला मिळाले. अजितदादांनी देखील स्मितहास्य करत प्रतिसाद दिला.
दरम्यान, मोदी-पवार भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्या व्हिडिओत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात थोडासाच, पण दिलखुलास संवाद झाल्याचं दिसून येत आहे. तसेच, शरद पवारांनी मोदींचा हात हाती घेऊन, त्यांची पाठही थोपटल्याचे दिसून येत आहे.
या व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. आता अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांचा देखील एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे.