काळजी घ्या! राज्यात अतिवृष्टीचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात अलर्ट? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज..


पुणे : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे सध्या राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे.

दरम्यान, या सततच्या पावसामुळे नोकरदार वर्गाला सर्वाधिक फटका बसला आहे. कारण मुंबई लोकल काही मिनिटे उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतोय.

तसेच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील सहाही धरणांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. पुणेगाव धरण ७५ टक्के भरले आहे. त्यातून उनंदा नदीत १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

यामुळे वणी आणि चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेला वाल्हेरी धबधबा प्रवाहित झाल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पावसामुळे सातपुडा परिसर निसर्गरम्य बनला आहे.

वाल्हेरी धबधबा सुरू झाल्याने नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक आनंद घेण्यासाठी येत आहेत. मात्र, प्रशासनाकडून येथे कोणतीही उपाययोजना नसल्याने अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पर्यटकांकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जात आहे.

दरम्यान, हवामान खात्याने आज भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कालही भंडारा जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. आज ‘ऑरेंज अलर्ट’ असल्याने दिवसभर संततधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!