Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ! मुश्रीफ यांच्यासह मुलांनी केली शेतकऱ्यांची फसवणूक, कोर्टाचे निरीक्षण..
Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असे निरीक्षण पीएमएलए कोर्टाकडून नोंदवण्यात आले आहे. महेश गुरवचा जामीन अर्ज फेटाळताना पीएमएलए कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले. Hasan Mushrif
शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणावरील सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं हसन मुश्रीफ यांचे पीए आणि निकटवर्तीय असणारे महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यापूर्वी पीएमएलए कोर्टानं हसन मुश्रीफ यांनाही अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला असून अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यापाठोपाठ आता मेहश गुरवही अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.
मंत्री हसन मुश्रीफ आणि महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए कोर्टानं फेटाळल्यानंतर आता याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनीही अटकपूर्व जामीनासाठीचा मार्ग आणखी कठीण होत असल्याचे दिसत आहे.
याप्रकरणी या सर्वांनी मिळून घोटाळा केल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलं आहे. त्यामुळे याप्रकरणात कोणालाही अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केले आहे.