अखेर जेठालालचं स्वप्न पूर्ण? बबिताजींसोबत थाटामाटात लग्न; व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते खूश

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. मालिकेतील प्रत्येक पात्राची सोशल मीडियावरही मोठी चर्चा असते. विशेषतः जेठालाल आणि बबिताजी यांच्यातील मजेशीर प्रसंग प्रेक्षकांना कायम आवडतात.
आता सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेठालाल आणि बबिताजी लग्न करताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांना वरमाळा घालत असल्याचे या क्लिपमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना जेठालालचे वर्षानुवर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्याचे वाटले.

व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय?
व्हायरल क्लिपमध्ये जेठालाल आणि बबिताजींचे दक्षिण भारतीय पद्धतीने लग्न दाखवण्यात आले आहे. दयाबेन स्वयंपाक करताना, तर चंपकलाल टोमॅटो कापताना दिसतात. बापूजी, डॉक्टर हाथी आणि सोढी एकत्र बसून गप्पा मारत असल्याचेही दाखवण्यात आले आहे.


यानंतर दयाबेन बबिताजींची साडी व्यवस्थित करताना दिसतात. पुढे संपूर्ण गोकुळधाम सोसायटी एकत्र जेवण करत असल्याचे दृश्य आहे. या भन्नाट क्लिपमुळे चाहत्यांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे.
पण हा व्हिडीओ खरा आहे का?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मालिकेतील खरा प्रसंग नाही. हा व्हिडीओ AIच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जेठालाल आणि बबिताजींचे प्रत्यक्षात लग्न झालेले नाही.
व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी जेठालालचे स्वप्न पूर्ण झाल्याची मजेशीर टिप्पणी केली, तर काही चाहत्यांनी AIच्या वाढत्या वापरावर प्रतिक्रिया दिल्या. विशेष म्हणजे, या काल्पनिक लग्नातही पोपटलालचे लग्न झालेले नाही, याचीही चाहत्यांनी गंमत केली.
मालिकेत सध्या काय सुरू आहे?
दरम्यान, मालिकेच्या सध्याच्या कथानकात माधवी आणि आत्माराम भिडे यांच्या घरगुती व्यवसायाशी संबंधित FDA तपासणीचा ट्रॅक दाखवण्यात येत आहे. माधवी भिडे घरगुती पद्धतीने लोणचे आणि पापड विकतात.
कथानकानुसार, FDA अधिकाऱ्यांकडून त्यांच्या उत्पादनांची तपासणी केली जाते. यावेळी लिंबू-मिरचीच्या लोणच्यात काचेचा तुकडा आढळल्याचा दावा अधिकारी करतात आणि भिडे कुटुंबाला नोटीस देतात. या नव्या कथानकामुळेही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.