घटस्फोटानंतर पुन्हा हार्दिक पांड्या प्रेमात, थेट फोटो शेअर करत जगजाहीर केले नाते, नव्या गर्लफ्रेंडच्या संपत्तीचा आकडा समोर…

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नताशा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. अचानक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची घोषणा हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी केली.

दोघेही मिळून मुलाचा सांभाळ करणार असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले. आता नताशा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा हार्दिक पांड्या हा प्रेमात पडलाय.

नुकताच तो गर्लफ्रेंडसोबत विमानतळावर स्पॉट झाला तर त्याने थेट मालदीवमधील खास फोटोही शेअर केला. ज्यामध्ये हार्दिक पांड्याची नवीन गर्लफ्रेंड मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा स्पष्ट दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा या सतत रंगताना दिसल्या. आता दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसतंय. हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये तो काळा शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला दिसतोय, तर माहिका शर्मा ही पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये त्याच्यासोबत उभी दिसत आहे. दोघांचाही लूक जबरदस्त दिसत आहे. मागच्या बाजूचा त्याने फोटो शेअर केलाय. मात्र, ही माहिका शर्माच आहे.
हार्दिकसोबत दिसलेली ही तरुणी म्हणजे अभिनेत्री आणि फिटनेस मॉडेल माहिका शर्मा. अवघ्या २४ वर्षांची माहिका ही दिल्लीची रहिवासी असून तिने अर्थशास्त्र आणि फायनान्स या विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. ती एक अभिनेत्री, मॉडेल आणि फिटनेस इन्फ्लुएंसर म्हणून मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे.
सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत आणि तिच्या आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तिमत्वामुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि माहिका एकमेकांसोबत खूप सहज वावरताना दिसले, ज्यामुळे त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
माहिकाने आतापर्यंत अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध रॅपर रागाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. इतकेच नाही, तर ऑस्कर-विजेत्या ‘इंटू द डस्क’ या माहितीपटाचाही ती एक भाग होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती विवेक ओबेरॉयसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये काम केल्यानंतर.
दरम्यान मॉडेलिंग आणि फिटनेस इंडस्ट्रीतून माहिका मोठी कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती अंदाजे ३.२० कोटी रुपये आहे. तिच्या लक्झरी जीवनशैली आणि फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. हार्दिकसोबत सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच दिसल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी, दोघांकडूनही अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
