Hadapsar News : पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे न घेतल्याने पत्नीवर अ‍ॅसिड फेकले अन्…, हडपसर येथील धक्कादायक घटना


Hadapsar News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कौटुंबिक वादामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेल्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. पत्नीने ही तक्रार मागे घ्यावी यासाठी पतीने तिच्या अंगावर अ‍ॅसिड टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

ही धक्कादायक घटना हडपसरमधील भेकराईनगर येथे असलेल्या मोरया हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Hadapsar News

याप्रकरणी श्रीहरी बब्रुवान नरवटे (वय. ३५ रा. खरोसा, लातूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अनिता श्रीहरी नरवटे (वय. ३१ रा. भेकराईनगर) या जखमी झाल्या असून त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.१) फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, श्रीहरी आणि अनिता हे दोघे पती-पत्नी आहेत. कौटुंबिक वादामुळे ते दोघे काही वर्षांपासून विभक्त राहात आहेत. फिर्यादी अनिता या मोरया हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिष्ट म्हणून काम करतात. त्यांनी सासरच्या लोकांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान,  मंगळवार (ता.३१)  रोजी आरोपी श्रीहरी हॉस्पिटलमध्ये आला. त्याने ‘आमच्यावरील केस मागे घेत नाहीस ना… थांब तुला दाखवतो’ असे म्हणत सोबत आणलेले अ‍ॅसिड अनिता यांच्या अंगावर फेकले.

या घटनेत अनिता गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!