लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; तपासा तुमचे खाते


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या महिलांच्या बँक खात्यात आता १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी १० जून रोजी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली होती.

याआधी राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता. आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे.

मे महिन्याचा हप्ता १५ जूनपासून वितरित केला जात असला तरी, तांत्रिक कारणांमुळे किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचा ‘एसएमएस’ प्राप्त झालेला नाही. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!