आनंदाची बातमी! मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती

मुंबई : अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मान्सून आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरीही समाधानी झाला आहे.
देशात पुन्हा उडाली खळबळ! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करत मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, आणि
एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचे आगमन झालेले आहे. देशात मान्सूनचे आगमन झालेले आहे. आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिलीय. हवामान खात्यानं तशी माहिती दिलीय. लवकरच मान्सूनचे राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे.
बैलाने काढला सगळ्या गावकऱ्यांचा घाम! घराच्या छतावर चढला बैल अन्..
जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. परंतु आता मान्सूनचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेला पूर्णविराम लागला आहे. केरळमधील बऱ्याच भागांमध्ये आज पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु यावर्षी पाऊस तब्बल ७ दिवसांनी उशिरा दाखल झाला आहे.
लोकं मारतील म्हणून आरामबसच्या वाहन चालकाचा पळून जाताना वाहनाने चिरडले; उरुळी कांचन येथील घटना
दरम्यान, हवामान खात्याने गुरूवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.