आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण सुरूच, जाणून घ्या आजचे दर…

पुणे : सोन्याच्या दरात मोठी घसरण होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्यावर आता मंगळवारी सुद्धा सोने स्वस्त सझाले आहे. सोन्याच्या दरात सातत्त्याने घसरण होत असल्याने आता स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.
आज 8 एप्रिल रोजी 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर घटले असून, चांदीच्या किंमती मात्र स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर मंगळवारीही ही घसरण कायम राहिल्याने ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे.
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने: ₹82,400 (₹600 ने घसरण)
22 कॅरेट प्रति 1 ग्रॅम सोने: ₹8,225
22 कॅरेट प्रति 100 ग्रॅम सोने: ₹8,24,000
गेल्या काही दिवसांत 22 कॅरेट सोन्याचा दर सातत्याने घसरत आहे. 7 एप्रिल रोजी हाच दर ₹83,000 होता, त्यामुळे आज खरेदी केल्यास ग्राहकांना थेट ₹600 पर्यंत फायदा होणार आहे.
24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे..
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने: ₹89,730
24 कॅरेट प्रति 1 ग्रॅम सोने: ₹8,973
18 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने: ₹67,420 (₹490 ने घसरण)
18 कॅरेट प्रति 1 ग्रॅम सोने: ₹6,730
सोन्याच्या सर्व प्रकारांमध्ये आज किंमती खाली आल्यामुळे दागिने खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी आजचा दिवस फायदेशीर मानला जात आहे.
चांदीचे दर जाणून घ्या..
10 ग्रॅम चांदी: ₹940
100 ग्रॅम चांदी: ₹9,400
1 किलो चांदी: ₹94,000