व्हॉट्सॲपच्या यूझर्ससाठी आनंदाची बातमी! आले आहेत नवीन फीचर्स, जाणून घ्या…

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कंपनी सतत त्यात नवनवीन फीचर्स जोडत राहते. मेटाच्या या मेसेजिंग ॲपच्या लेटेस्ट अपडेटसह, आणखी एक नवीन फीचर जोडले गेले आहे. जे

यूझर्सचा चॅटिंग एक्सपीरियन्स आणखी सुधारेल. काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की, व्हॉट्सॲपचा लूक बदलणार आहे. या मेसेजिंग ॲपमध्ये आता टायपिंग इंडिकेटर जोडण्यात आले आहे, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव अधिक चांगला होईल.
व्हॉट्सॲपच्या या टायपिंग इंडिकेटर फीचरमध्ये यूजर्सना मेसेज टाइप करताना व्हिज्युअल साइन दिसेल. हे फीचर वन ऑन वन किंवा ग्रुप चॅट या दोन्हीमध्ये काम करेल. अलीकडेच कंपनीने ॲपमध्ये व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्स फीचर जोडले आहे.

ज्याद्वारे यूझर्स व्हॉइस मेसेजचे ट्रान्सक्रिप्ट वाचू शकतात. हे फीचर बोरिंग ‘…’ साइनच्या ऐवजी व्हिज्यूएल क्यू दाखवले. हे क्यू चॅट विंडोच्या सर्वात खाली दिसेल. यामध्ये समोर येणाऱ्या यूझर्सच्या प्रोपाइल पिक्चरसोबत हा क्यू दिसेल.
व्हॉट्सॲपमध्ये आता तुम्ही तुमच्या फोनचा कॅमेरा वापरून नवीन स्टिकर्स तयार करू शकता. स्टिकर तयार करा, पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर कॅमेरा वापरून फोटो क्लिक करा. तुम्ही फ्रंट किंवा मागील कॅमेरा वापरून फोटो क्लिक करू शकता, जे नंतर स्टिकरमध्ये रूपांतरित होईल.
व्हॉट्सॲपमध्ये स्टिकर तयार करताना तुम्ही मजकूर, इमोजी आणि इतर घटक जोडू शकता. ॲप तुम्हाला स्टिकर संपादित करण्याची अनेक पर्याय देतो, ज्यामुळे तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकता. तयार केल्यानंतर, तुम्ही ते तुमच्या संपर्कांसोबत सहज शेअर करू शकता. सध्या हे फीचर फक्त Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, परंतु लवकरच iOS वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध होईल.