१ लाखांपार पोहोचलेल्या सोन्याचे दर पुन्हा घसरले, अक्षय तृतीयेआधी सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या…

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून आकाशाला गवसणी घालणाऱ्या सोन्याच्या किंमती आता खाली येण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी २२ एप्रिल रोजी सोनं १ लाखांवर गेले होते. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनं घसरलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले आहेत.
आज 22 कॅरेट सोन्याचे दर 90,000 रुपये आणि 24 कॅरेट 10ग्रॅम सोन्याचा दर 98,200 रुपयांवर व्यवहार करत आहे. चांदी 1 लाख रुपयांवर ट्रेड करत आहे. गुरुवारी 24 एप्रिल 2025 रोजी चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
चांदीचे दर 1,00,900 रुपयांवर व्यवहार करत आहेत. बुधवारच्या तुलनेत चांदी आज 200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 90,050 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 98,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे.
दरम्यान,अमेरिका आणि चीन यांच्यात वाढत जाणाऱ्या व्यापारी तणाव आणि टॅक्साबाबत धोरणं यामुळं सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं पुन्हा एकदा महाग झाले आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे.
तज्ज्ञांच्या मते, पुढील ६ महिन्यात सोन्याचे दर साधारण 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होऊ शकतात. मात्र जर अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले तर त्याचा परिणाम मौल्यवान धातुवर होऊ शकतो.
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 90,050 रुपये
24 कॅरेट- 98,240 रुपये
18 कॅरेट- 73,680 रुपये