Gold Price : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता १ तोळा सोन्याचांदीला मोजावे लागतील ‘एवढे’ रुपये, जाणून घ्या..

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. तसेच आता भारतात आता सणावारांना सुरुवात झाली आहे. अनेकजण घरातील समारंभांसाठी सोन्याचांदीची खरेदी करण्यास पसंती देत आहेत.
दरम्यान, सराफा मार्केटमध्ये सध्या सोन्याचांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वरदळ वाढली आहे. महिन्याच्या शेवटी सोन्याचांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. Gold Price
मागील आठवड्यापासून सोन्याचांदीच्या दरात चढउतार सुरु असताना काल सोन्यासह चांदीच्या भावातही किंचित घसरण झाली आहे. त्यामुळे तोळ्यामागे आता ग्राहकांना किती रुपये द्यावे लागतील? १० ग्रॅमचा भाव काय? जाणून घेऊया आजचे ताजे भाव..
ग्राहकांना जरी आज दिलासा मिळणार असला तरी सोन्याच्या किंमतीत केवळ ९० रुपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याला आता ग्राहकांना ७६,८३१ रुपये द्यावे लागतील.
तर १० ग्रॅम सोन्याची किंमत सध्या ६५,८७२ रुपये झाली आहे. २४ कॅरेट सोनं सध्या तोळ्यामागे ८३,८१६ रुपये असून दहा ग्रॅमसाठी ७१,८६० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.
तुमच्या शहरात काय आहे भाव?
शहर सोनं (१०gm) चांदी (kg)
मुंबई ७१,७३० ८४, ९२०
पुणे ७१,७३० ८४, ९२०
नाशिक ७१,७३० ८४, ९२०
औरंगाबाद ७१,७३० ८४, ९२०
नागपूर ७१, ७३० ८४, ९२०