निष्ठावतांना संधी द्या!! छत्रपती सहकारी कारखाना निवडणुकीत सभासदांची मागणी, येत्या दोन दिवसात उमेदवार यादी होणार अंतिम…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूकीत सध्या इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारीची मागणी करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी एकत्र येत कारखाना बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे अनेक इच्छुकांना माघार घ्यावी लागणार आहे.
असे असताना कारखाना कार्यक्षेत्रात निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आधीच्या संचालक मंडळातून पुन्हा कोणाला संधी दिली जाणार नसल्याचे अजित पवार यांनी आधीच सांगितले आहे. तसेच कारखाण्याची सूत्रे जाचक यांच्याकडे देणार असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे.
यामुळे आता संघर्षाच्या काळात जाचक यांच्या मागे ठामपणे उभे राहिलेल्या लोकांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. इंदापूरचे आमदार मंत्री दत्तामामा भरणे यांची भूमिका देखील आता महत्वाची असणार आहे. भरणे यांच्याकडे मार्जितले इच्छुक प्रयत्न करत आहेत. यामुळे जाचक बापू गटातील अनेकांना माघार घ्यावी लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
यामुळे निष्ठावतांना संधी देण्याची मागणी केली जात आहे. आता पुढील दोन दिवसांत अंतिम उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. यानंतर आता कोणी भेटू नये, अशी तंबी अजित पवार यांनी दिली होती. यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.