काय सांगता! नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चक्क खुर्च्या रिकाम्या, कारण आले समोर
नाशिक : नाशिकमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा काल लावणीचा कार्यक्रम पार पडला. सध्या सगळीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला गर्दी असते. बसायला देखील जागा उपलब्ध नसते.
असे असताना नाशिकमध्ये प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पाठ फिरवली आहे. कार्यक्रमाचे तिकीट दर जास्त असल्याचे कारण यामागे सांगितले जात आहे. यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या.
गौतमीच्या कार्यक्रमाला 300 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंतचे तिकीट लावण्यात आले होते. यामुळे अनेकांनी याठिकाणी न येणच पसंद केले. दरम्यान, या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली.
या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. आलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रम सुरू होताच हुल्लडबाजी सुरू केली. हुल्लडबाजांनी इतका गोंधळ घातला की आयोजकांना वारंवार कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा द्यावा लागला.