Gautami Patil : गौतमी पाटील अहमदनगर कोर्टात हजर, अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण काय?

Gautami Patil : रिल्सस्टार तथा डान्सर गौतमी पाटील आणि वाद हे एक समीकरणच झालं आहे. गौतमी पाटील तिच्या डान्स स्टाईलमुळे प्रसिद्ध झाली. गौतमी पाटील सोशल मीडियामुळे अल्पावधित प्रसिद्धीच्या झोतात आली.

तिच्या डान्सच्या कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी होते. पण असं असलं तरीही तिच्या कार्यक्रमाला काही तरुणांकडून हुल्लडबाजी होण्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला गालबोट लागलेलं बघायला मिळालं होते.

अहमदनगरमध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर तिच्यावर नियमभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाईपलाईन रोडवरील या कार्यक्रमासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली होती, परंतु कार्यक्रम तसाच पार पडला. यामुळे गौतमी पाटीलविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. Gautami Patil

गौतमी पाटील हिला आज अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर व्हावं लागलं. न्यायमूर्तींनी तिच्या बाजूचा सखोल विचार करून तिला अटी-शर्तींच्या आधारे जामीन मंजूर केला. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, गौतमीला पुढील काळात नियमांचे उल्लंघन न करण्याचे बंधन आले आहे.
या घटनेनंतर गौतमीच्या कार्यक्रमांवर आणि तिच्या स्टाईलवर होणाऱ्या टीकांची पुनरावृत्ती झाली आहे. कोर्टाच्या आदेशांनुसार, तिला नियमांचे पालन करूनच आगामी कार्यक्रमांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
