गौतमी पाटीलचा ‘हा’ आवडता क्रिकेटपटू ! याबाबत स्वतःच केला खुलासा…!

पुणे : राजकीय कार्यक्रम असो, उद्घाटन असो किंवा बर्थ डे असो इतकंच काय तर बैलाच्या बर्थ डेला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. तरुणांपासून महताऱ्यांपर्यंत अनेक गौतमीचे चाहते आहेत. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा गोंधळ हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. गौतमीच्या कार्यक्रमात सतत गोंधळ होतच असतो. त्यामुळे गौतमी सतत चर्चेत असते.
याचदरम्यान गौतमी पाटीलला वेगवेगळे प्रश्न देखील विचारले जातात दरम्यान, गौतमीला एका मुलाखतीत मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग कोण आवडत? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गौतमीने मला मुंबई इंडियन्स आवडते असं सांगितलं.
त्याचबरोबर पुढे तिला विचारण्यात आले कोणता क्रिकेटर आवडतो? यावर उत्तर देत गौतमीनं एमएस धोनी हे नाव घेतलं. क्रिकेट पाहायला आवडतं असल्याचे देखील यावेळी तिने सांगितले आहे.
Views:
[jp_post_view]