Gas Cylinder : नवीन वर्षाआधीच एलपीजी ग्राहकांना मोठी भेट! गॅस सिलिंडरचे दर कमी झाले, जाणून घ्या नवीन दर..


Gas Cylinder  : एलपीजी गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना आज सकाळी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. म्हणजेच आजपासून देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत.

यानंतर आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरवर सुमारे ४० रुपये कमी मोजावे लागतील. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. Gas Cylinder

हा दिलासा सर्वसामान्यांना लोकांना नसून छोटे दुकानदार आणि हॉटेलमालकांना देण्यात आला आहे. फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातच कपात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

आपण जर घरगुती गॅस सिलेंडर बाबत पहिले तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. साधारणत: गॅस सिलिंडरच्या दरात महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल केला जातो मात्र यावेळी ख्रिसमस सणाच्या आधीच गॅसचे दर कमी करण्यात आले आहेत.

दरम्यान,  १ जानेवारीपूर्वी एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. आजपासून म्हणजे २२ डिसेंबरपासून दिल्ली ते पाटणापर्यंत एलपीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त झाला असून ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे, तर घरगुती सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!