Garlic Price : नवलच! लसणाला आलाय सोन्याचा भाव, चोरी होऊ नये हातात बंदूक घेऊन होतीय राखण, जाणून घ्या…
Garlic Price : स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते. लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते.
भारताचा लसणाचा व्यापार सतत वाढत आहे. सध्या लसणाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकेकाळी कवडीमोल भावात लसूण आता ४०० रुपयांच्या वर गेला आहे. Garlic Price
लसणाचे हातात बंदूका घेऊन रक्षण…
लसणाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकरीवर्ग आता सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. लसणाची चोरी होऊ नये म्हणून शेतकरी थेट लसणाच्या शेतात संरक्षणासाठी हातात बंदूका घेऊन तैनात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे गट तयार केले असून या गटाची एकूण तीन-चार शिफ्टमध्ये विभागणी केली आहे.
त्यानुसार ते लसणाची पाहणी करत आहेत. मध्य प्रदेशातील आगर माळवा भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. लसणाची चोरी होऊ नये यासाठी शेतकरी हातात बंदुका, काठ्या घेऊन पिकाचे रक्षण करत आहे.
दर भिडले गगनाला…
लसणाच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे शेतातून लसूण चोरीला जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याने शेतकऱ्यांनी प्रत्येक प्रकारे आपली पिके वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. सध्या लसणाचा भाव वाढला असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढत आहे. अशा वेळी जर कोणी लसूण चोरी केला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
शेतकरी नेहमीच त्यांच्या पिकांची काळजी घेतात. त्याचे संरक्षण करतात, जेणेकरून वन्य प्राणी आणि भटके प्राणी त्यांच्या पिकांचे नुकसान करू शकत नाहीत. पण सध्या या भागातील शेतकरी थेट हातात बंदुका, काठ्या घेऊन पिकाचे रक्षण करत असल्याने यावर चर्चा होत असून सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.